Maharashtra Kesari Wrestling Competition : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यंदा अभिजित कटके मुकणार - Wrestler Abhijit Katke
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ( Maharashtra Kesari Wrestling Competition ) यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ( Maharashtra Wrestling Council ) स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. अशातच यंदा या स्पर्धेचे आयोजनामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
परंतु 2017 मध्ये महाराष्ट्र केसरी आणि सलग 4 वेळा फायनलमध्ये धडक मारलेला कुस्तीपटू अभिजित कटके ( Wrestler Abhijit Katke ), हा यंदाच्या महाराष्ट्र केसरीमध्ये सहभाग घेणार नाही. मागच्या वर्षी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फिट नसल्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो सहभागी होणार नाही. त्याच्या चाहत्यांसाठी आणि कुस्ती प्रेमींसाठी निराश करणारी बातमी आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST