Kirit Somaiya In Dapoli : किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात दाखल.. दापोलीत तणावाचे वातावरण - दापोलीत तणावाचे वातावरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14844526-thumbnail-3x2-kirit.jpg)
दापोली ( रत्नागिरी ) - भाजपा नेते किरीट सोमय्या अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाहून दापोलीत दाखल झाले ( Kirit Somaiya In Dapoli ) आहेत. त्यांच्यासोबत निलेश राणे हेही आहेत. दापोलीत येत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्यावतीने सोमय्या यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात ( Protest Against Kirit Somaiya In Dapoli ) आली. भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर याठिकाणी उपस्थित आहेत. सोमय्या यांनी दापोलीत पोहोचल्यावर अनिल परब आणि राज्य सरकार यांच्यावर आरोप केले आहेत. यानंतर किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. सोमय्या दापोलीत आल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST