Maratha Reservation Demand : मराठा महासंघाच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण; छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला दिले समर्थन - मराठा महासंघ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
🎬 Watch Now: Feature Video
जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे भोसले (Chatrapati Sambhajiraje Bhosale ) यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण ( Hunger strike at Azad Maidan ) सुरू केले आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालन्यातदेखील मराठा महासंघाच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात मराठा महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी ( Jalna Maratha Mahasangh Agitation ) करून परिसर दणाणून सोडत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST