चीनमधील व्यवहार पूर्वपदावर; सिनेमागृहेही झाली खुली..
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सोमवारपासून देशातील काही प्रांतांमध्ये सिनेमागृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली. शांघाय, हांझो आणि गुईलिन या प्रांतांमध्ये कोरोनाचा धोका कमी असल्यामुळे याठिकाणच्या चित्रपटगृहांना खुले करण्यात आले. यावेळी खबरदारी म्हणून प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य केले होते. तसेच, प्रेक्षकांमध्ये अंतर राखण्यासाठी मधली आसने मोकळी ठेवण्यात आली होती. मध्यांतरादरम्यान आणि चित्रपट संपल्यानंतर कर्मचारी संपूर्ण सिनेमागृहाला सॅनिटाईज करत होते. बीजींगमध्येही गेल्या १४ दिवसांमध्ये एकही स्थानिक नवा रुग्ण न आढळल्याने वैद्यकीय आणीबाणी मागे घेण्यात आली.