श्रीलंका निवडणूक: कोणाला मिळणार मुस्लीम मते? 'चर्चमधील बॉम्ब स्फोटानंतर मुस्लीम घाबरलेले' - मुस्लिम काऊन्सिल ऑफ श्रीलंका
🎬 Watch Now: Feature Video
कोलंबो - श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज सुरू आहे. राष्ट्राध्यक्षपदाची ही आठवी निवडणूक आहे. या निवडणुकीत तब्बल ३५ उमेदवार रिंगणात आहेत. श्रीलंकेच्या एकून लोकसंख्येपैकी मुस्लीम अल्पसंख्य १० टक्के आहेत. त्यांचा मते निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरु शकतात. श्रीलंकेमध्ये २१ एप्रिलला चर्चेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुस्लीम घाबरलेले आहेत. कट्टरतावादी गटांकडून हल्ले होण्याची भीती त्यांच्यामध्ये पसरली आहे, असे मुस्लीम काऊन्सिल ऑफ श्रीलंकाचे उपाध्यक्ष हिलमय अहमद यांनी व्यक्त केले. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. पहा या मुलाखतीचा विशेष वृतांत.