फोटोच्या नादात तरुणी पाय घसरून कुंडमळ्यात पडल्या; एकीचा मृत्यू, एकीला वाचवण्यात यश - पुणे मावळ कुंडमळा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 17, 2022, 12:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

पुणे - मावळमधील कुंडमळ्यात ( pune kundmala maval ) फोटो काढण्याच्या नादात दोन तरुणी पाय घसरुन पडल्या ( young woman slipped and fell into Kund in maval ) होत्या. यापैकी एकीला वाचवण्यात यश आले आहे. तर एकीचा बुडून मृत्यू झाला ( Girl drown In Pune ) आहे. या घटनेत इंदू मॅकलेरी हिचा मृत्यू झाला असून योगिता भूषण वाघ असे वाचवण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. दोन्ही मैत्रिणी असून त्या कुंडमळा परिसरात फिरण्यास गेल्या होत्या. फोटो काढत असताना पायाला चटके बसत असल्याने इंदूचा पाय घसरून ती कुंडमळ्यात पडली असे तळेगाव MIDC पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि इंदू या दोघी मैत्रिणी आहेत. त्या बुधवारी दुपारी तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंडमळ्यात फिरण्यास गेल्या होत्या. त्या कुंडमळ्यात फोटो काढत असताना इंदूने पायातील सॅनडेल काढून थांबली. मात्र, पायाला चटके बसत असल्याने पाय खालीवर केले. तेव्हा तिचा पाय घसरून ती खाली पडली. इंदूला वाचवण्यासाठी योगीताने उडी घेतली त्यांचा आरडाओरडा ऐकूण शेजारीच असलेल्या काही स्थानिक आणि मच्छीमार त्यांच्या मदतीला धावून आले. योगीताला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. परंतु, या घटनेत इंदुचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.