Imtiaz Jaleel in Parliament : रशिया-युक्रेनच्या पार्श्वभूमीवर खतांच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात- इम्तियाज जलील - Imtiaz Jaleel in Parliament
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली- खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel AIMIM Maharashtra ) यांनी खताच्या समस्येबाबत प्रश्न संसदेत उपस्थित केला. रशिया व युक्रेनकडून गेल्यावर्षी 20 दशलक्ष टन अमोनिया आला होता. आताच्या परिस्थिती अमोनिया पुरेसा येत नाही. खतांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ( price control on fertilizers ) सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी खासदार जलील यांनी केली. तसेच अनेक कंपन्यांकडून खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना इतर उत्पादन खरेदी करण्यासाठी आग्रह केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी ( MoS Agriculture Kailash Chaudhary ) खतांच्या किमती ( supply of fertilizers in India ) वाढूनही सरकारकडून अनुदान दिले जात असल्याचे सांगितले. तसेच खतांचा साठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST