Raj Thackeray Loudspeaker Issue : 'मला वाटतंय माझं शहर शांत राहिलं पाहिजे' : मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे - पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचा राजीनामा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांची तोफ गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थीवर ( MNS Gudhipadwa Melava 2022 ) धडाडली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यालाही तीव्र विरोध ( Raj Thackeray On Mosque Speaker ) केलाय. मशिदीवरील भोंगे सरकारला काढावेच लागतील. नाहीतर त्या भोंग्यांसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ( Raj Thackeray Hanuman Chalisa Issue ) दिलाय. राज यांच्या या भूमिकेचे पडसाद आज काही ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान, राज यांच्या या भूमिकेमुळे मनसेतील काही नेते नाराज असल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर राज यांच्या या आदेशानंतर पुण्यात मनसेतील 2 मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा ( MNS Activists Resignation Pune ) दिला. एकूणच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर पुण्यात मनसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. एकूणच पुण्यातील पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे याबाबत बातचीत केलीय मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे ( Vasant More Against Raj Thackeray Speech ) यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST