VIDEO : महाशिवरात्रीच्या औचित्यावर भीमाशंकर येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हस्ते महापूजा भीमाशंकर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14601906-thumbnail-3x2-dk.jpg)
पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil at Bhimashankar Jyotirling ) यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. ( Puja by the hands of Home Minister Dilip Walse Patil at Bhimashankar ) कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच भीमाशंकर येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रसंगी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. भीमाशंकर देवस्थानच्या वतीने खासगी सुरक्षा रक्षकही ठेवण्यात आले आहेत. भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भीमाशंकर परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST
TAGGED:
भीमाशंकर महाशिवरात्री 2022