Rosh Boda Video Recipe : उडदाच्या डाळीपासून गोड पदार्थ बनवला? पाहा रोश बोडाची रेसिपी - Black Gram
🎬 Watch Now: Feature Video
रोश बोडा हा गोड पदार्थ ( Rosh Boda Recipe ) आहे. जेवण झाल्यावर स्विट्स म्हणून आपण रोश बोडा खाऊ शकतो (sweets ). तो उडदाच्या डाळीपासून बनवतात. मुख्यतः दक्षिण भारतातील पारंपरिक, सांस्कृतिक खाद्यपदार्थांमध्ये उडदाच्या डाळीचा ( Black Gram ) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात आवश्यक खनिजे, प्रोटीन, वेगवेगळे व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटी ऑक्सिडंन्ट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यासाठी उडदाची डाळ 2-3 तास भिजवून घ्यायची असते. त्याची पेस्टकरून त्यात बेकींग सोडा, मीरे पावडर, चवीनुसार मीठ त्यात मिक्स करावे. त्यानंतर वेलदोडे आणि साखरेचा पाक तयार करून त्यात ते टाकावेत. पाकात चांगले मुरेपर्यंत ते ठेवावेत. अशा प्रकारे रोश बोडा खाण्यासाठी तयार होतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST