हृतिक रोशनने केला बॉलिवूडमधील अद्भूत प्रवासाचा खुलासा - journey in Bollywood is miracle
🎬 Watch Now: Feature Video
बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने सांगितले की, त्याने आपल्या कारकिर्दीत या टप्प्यावर पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांवर मात केली आहे. अभिनेता होण्याआधीच्या त्याच्या संघर्षाची आठवण करून देताना, 48 वर्षीय स्टार म्हणाला की इंडस्ट्रीतील त्याच्या प्रवासाचा अभिमान आहे. रोशनने सांगितले की, तब्येतीची चिंता असूनही त्याने स्वत:ला अॅक्शन फिल्म्स आणि डान्स सीक्वेन्स करण्यास सक्षम बनवले आहे. विक्रम वेधा या त्याच्या आगामी चित्रपटातील अल्कोहोलिया गाण्याच्या लाँचच्या वेळी, हृतिक म्हणाला, "मला खूप आनंद झाला आहे की माझ्या 25 व्या चित्रपटात मी अजूनही अॅक्शन करत आहे, अजूनही डान्स करत आहे आणि माझे संवाद बोलण्यास सक्षम आहे हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. मला वाटतं की २१ वर्षापूर्वीच्या मी ला आजच्या मी चा अभिमान वाटत आहे."
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST