धनुष स्टारर 'कॅप्टन मिलर' मोठ्या पडद्यावर धूमधडाक्यात प्रदर्शित - Dhanush as Daku
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 12, 2024, 12:35 PM IST
चेन्नई (तामिळनाडू) -
Dhanush starrer Captain Miller release : अभिनेता धनुषची भूमिका असलेला 'कॅप्टन मिलर' हा तमिळ अॅक्शनर चित्रपट आज, १२ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. संक्रातीच्या निमिततानं रिलीज झालेला हा पोंगल स्पेशल चित्रपट सणाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा आहे.
अरुण माथेस्वरन दिग्दर्शित कॅप्टन मिलर हा तमिळ अॅक्शन एंटरटेनर आहे. चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष आणि अरुण यांचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथानक ब्रिटीश कालीन भारतातील 1930-1940 च्या दशकात घडतं. मिलर नावाच्या एका डाकूचे जीवन उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात प्रियांका मोहन, संदीप किशन, विनोथ किशन, शिवा राजकुमार, जॉन कोकेन आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे, सर्वांनी त्यांच्या भूमिकांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीत दिले असून सिद्धार्थ नुनी यांनी सिनेमॅटोग्राफी हाताळली आहे आणि नागूरन रामचंद्रन यांनी संकलन केले आहे. सुरुवातीला D47 असे शीर्षक असलेला हा धनुष स्टारर चित्रपट तो साकारत असलेल्या भूमिकेच्या नावावरुन कॅप्टन मिलर असे शीर्षकासह प्रदर्शित करण्यात आला.
हेही वाचा -