Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलाकडे घातले 'हे' साकडे, पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यातील सासवड येथील अवघड अशा दिवेघाटामध्ये पोहोचला आहे. दिवेघाट पार करणे म्हणजे सगळ्यात मोठी अवघड वाट असल्याचे वारकरी सांगत असतात. पालखी सोहळ्यामध्ये आज खासदार सुप्रिया सुळे यादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वारकऱ्यासोबत झेंडेवाडीपर्यंत पायी वारी सुद्धा केली आहे. विठ्ठलाकडे एवढेच मागणे की, यावर्षी पाऊस कमी आहे, पाऊस पडू दे. अडचणीत असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, हे साकडे सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलाला घालते आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर तुम्ही वारीत सहभागी होत आहे. पक्षासाठी काय मागणार या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विठ्ठलाला सर्व काही माहीती असते. त्यामुळे पक्षासाठी विठ्ठलाकडे काही मागणार नाही. तसेच सहा पदरी पालखी महामार्ग झाल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातो. कारण या मार्गावरील सगळी झाडे तोडण्यात आली आहेत. ऊन खूप असल्याने चालताना त्याचा त्रास होतो आहे. याविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही अनेक दिवसांपासून ही मागणी केली गेली की, महामार्गावरील झाडे लावा. परंतु प्रशासनाने याविषयी काय केले हे मला माहीत नाही. आमची मागणी ती आहेच. त्याचबरोबर ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत. त्या करण्यासाठी आपण प्रशासनासोबत काम करू. वारकऱ्यांचा पालखी सोहळा सर्व सुख सुविधा युक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी आज दिली आहे.