मोदी सरकारकडून दबावाचे राजकारण; संजय राऊत प्रकरणी शिवसैनिक आक्रमक - Modi government
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांची त्यांच्या राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी जवळपास नऊ तास चौकशी केली. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात ( Sanjay Raut in custody of ED ) घेतले. राऊतांना अधिकारी ईडी कार्यालयात नेत असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची धरपकड करावी लागली. तसेच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी घराच्या बाहेर येऊन सर्व शिवसैनिकांना हात वर करत पुन्हा एकदा आपला आत्मविश्वास दाखवला आहे. अशा कारवाईला राऊत डगमगत नाही अशा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतले असले तरी संजय राऊत लवकरच या सर्व प्रकरणातून बाहेर येतील. केंद्रातील मोदी सरकार ( Modi Govt ) भारतीय जनता पक्ष ( Bharatiya Janata Party ) केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी घेऊन केवळ दबावाचे राजकारण करत आहे, असा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला. ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिकां संवाद साधला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST