Diwali Festival 2023: दिवाळीच्या सुट्ट्या, शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी; पाहा व्हिडिओ - Diwali Holiday Crowd In Shirdi Saibaba Temple
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 14, 2023, 5:06 PM IST
अहमदनगर (शिर्डी) Diwali Festival 2023 : दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्यानं आज देशभरातील लाखो भाविक साईच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. आज पाडव्या (Diwali Padwa 2023) निमित्तानं पहाटे पासूनच भाविकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. साईबाबा संस्थानने 112 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या दर्शन रांग (Saibaba Darshan Rang) सुरू झाल्यानंतर ही पहिली गर्दी झाली आहे. या आधी उन्हातान्हात भाविकांना अनेक अडचणींचा सामना करत साईबाबांच्या दर्शनासाठी जावं लागत होतं. यामुळे आता थेट वातानुकूलित दर्शन लाईन मधून जाऊन भाविक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतं असल्यानं, भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचा आनंद बघावयास मिळतोय. सर्वांची दिवाळी (Diwali) सुखाची आणि समृद्धीची जावी, यासाठी आज लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होत आहेत.