Diwali 2023 : शाहूनगरीत लक्ष्मीपूजनानंतर आसमंत उजळून टाकणारी नेत्रदीपक आतषबाजी, पाहा व्हिडिओ - मशाल महोत्सव
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 13, 2023, 5:37 PM IST
सातारा Diwali 2023 : दिवाळीच्या (Diwali Festival 2023) निमित्ताने पेन्शनर्स सिटी अर्थात शाहूनगरी (Shahungari) लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. रविवारी साताऱ्यात लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja) उत्साहात पार पडलं. चोपडी पूजन करुन व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात केली. लक्ष्मी पूजनानंतर सातारा शहरात फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. यवतेश्वर घाट तसंच चार भिंती परिसरातून राजधानी शाहूनगरी आतषबाजीने उजळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. एकंदरीत दिवाळीचा अपूर्व उत्साह शहरात दिसून आला. रात्री उशिरापर्यंत साताऱ्यात आसमंत दणाणून सोडणारी आतषबाजी सुरू होती. लक्ष्मीपूजनानंतर सज्जनगडावर मशाल महोत्सव (Mashal Mahotsav Sajjangad) पार पडला, तर ऐतिहासिक चार भिंतीच्या परिसरात तरूणांनी हुल्लडबाजी करत फटाके फोडल्याने वाळक्या गवताने पेट घेतला. या आगीत बरेच नुकसान झाले आहे.