अल्लू अर्जुन आणि मुलगी अर्हा यांनी दिला बाप्पाला निरोप - पाहा व्हिडिओ - ल्लू अर्जुनने दिला बाप्पाला निरोप
🎬 Watch Now: Feature Video
पुष्पा स्टार अल्लू अर्जुनने त्याच्या मुलीसह सोमवारी हैदराबादमध्ये बाप्पाला निरोप दिला. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर गणपती विसर्जन उत्सवाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन त्याची ५ वर्षांची मुलगी अल्लू अर्हासोबत दिसत आहे. अल्लू अर्जुन हा पर्यवरणप्रेमी आहे. यावेळी त्याने पर्यावरण-अनुकूल गणेश मूर्तीची स्थापना केली होती. व्हिडिओ शेअर करताना अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर "गणपती बाप्पा मोरया," असे लिहिले आहे. कामाच्या आघाडीवर, अभिनेता आगामी पुष्पाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST