Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाचे पुरावे सीबीआयला देणार; राणेंचे वकील मानेशिंदेची माहिती - नारायण राणे चौकशी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 5, 2022, 10:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - दिशा सालियन मृत्यूबाबत ( Disha Salian Case ) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियनच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर मालवणी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. त्यानुसार ते आज चौकशीसाठी मालवाणी पोलीस ठाण्यात हजर राहिले आहेत. त्यानंतर आता जवळपास 9 तास झाले मालावणी पोलीस नारायण राणे आणि नितेश राणे यांची चौकशी करत आहेत. राणे यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणात काहीही तथ्य नाही. राणे मंत्री असून त्यांना दुपारपासून बोलावले आहे. आम्ही या प्रकरणाचे पुरावे सीबीआयला देऊ. यामुळे नारायण राणे यांना त्रास होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.