Kapil Patil : देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व.. त्यांना जाणून बुजून नोटीस दिली : राज्यमंत्री कपिल पाटील - Five State Elections 2022
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक :-विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सक्षम नेतूत्व असून त्यांना जाणून बुजून नोटीस दिली ( Kapil Patil On Devendra Fadnavis Notice ) आहे. यातून काही समोर येणार नाही. ४ राज्यात सरकार ( Five State Elections 2022 ) आले, सर्वाना माहीत आहे. राज्य सरकार पडेल का नाही यावर आत्ता बोलण्याची योग्य वेळ नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यानी सांगितले ( Kapil Patil On MVA Government ) आहे.
रोजगार उपलब्ध होणार
देशात ३५ तर महाराष्ट्रत ३ लॉजीस्टिक पार्क आहेत. त्यात मुंबई, नाशिक, नागपूर यांचा समावेश आहेत. उद्घाटन कार्यक्रमाला घाई झाली असली तरी लॉजीस्टिक पार्क प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल. लॉजीस्टिक पार्कमुळे रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार..
लॉजीस्टिक पार्कच्या उद्घाटनपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. नाशिकचा कांदा, द्राक्ष,जळगावची केळी हे या लॉजीस्टिक पार्कच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येईल. त्यामूळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असल्याचे ना. पाटील म्हणाले. यावेळी नाशिकचे सहप्रभारी जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, उद्धव निमसे,अनील भालेराव, सुरेश खेताडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST