Baramati Ccimr : बारामतीत युवतीवर चाकू हल्ला; पाहा VIDEO - बारामतीत युवतीवर चाकू हल्ल्याचा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 18, 2022, 3:25 PM IST

बारामती - शहरातील नीरा डावा कालव्या शेजारी असणाऱ्या पूर्वा कॉर्नर कॉम्प्लेक्समधील (Purva Corner Complex) केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये मंगळवारी (दि. १८) सकाळी पर्यटनाचे बुकिंग घेणाऱ्या युवतीवर चाकू हल्ला (Girl Stabbed) करण्यात आला. एका तरुणाने हा हल्ला केला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्ल्यात युवतीच्या हातावर जखम झाली आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता केसरीच्या रजत टुर्सचे कार्यालय उघडल्यानंतर एका युवकाने आतमध्ये प्रवेश केला. मी सोमवारी कार्यालयात येवून गेलो, परंतु तुम्ही कार्यालय लवकर बंद केले असे म्हणत या युवकाने युवतीच्या गळ्यात हात घातला. आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरतोय की काय अशी शंका तिला आल्याने तिने त्याचा हात पकडला. माझा हात सोड, असे म्हणत हातावर चाकूचा वार करत हा युवक पळून गेला. घाईत चप्पल न घालताच तो दुचाकीवरून पसार झाला. युवतीने कार्यालयाबाहेर येत त्याचा पाठलाग केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.