गौरी आवाहनाच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकारांचा साज - पंढरपूर लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आज (रविवार) गौरी आवाहन दिनानिमीत्त विठ्ठल व रूक्मिणी मातेस पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आली होती. पारंपरिक पोशाख व अलंकारमध्ये विठुरायाचे रूप अधिकच न्याहाळून निघाले होते. रुक्मिणी मातेला सुंदर अलंकाराने सजवण्यात आले होते. विठुराया व रुक्मिणी मातेला सणासुदीला विशिष्ट प्रकारचे अलंकार घालण्यात येत असतात. गेल्या सहा महिन्यापासून विठुरायाचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे, तरी विठ्ठल मंदिर समितीकडून विठुरायाच्या सावळ्या रूपाचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून चालू असते.