ETV Bharat / state

माळेगाव यात्रेत धनंजय मुंडेंचा 'बादल' ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू; राजकीय नेते अन् प्रतिष्ठित घराण्यांच्या घोड्यांचीच चर्चा - DHANANJAY MUNDE BADAL HORSE

धनंजय मुंडेंच्या बादल नावाच्या घोड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आमदार हेमंत पाटलांचे सहा घोडे राहुटीत दाखल झालेत. ते पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याची पाहायला मिळतेय.

Dhananjay Munde Badal horce
माळेगाव यात्रेत धनंजय मुंडेंचा 'बादल' (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 1:43 PM IST

नांदेड- माळेगाव यात्रेत राजकीय नेत्यांच्या घोड्यांचे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या यात्रेत प्राणी प्रेमींनी अश्व प्रदर्शनही भरवलंय. राहुटीच्या माध्यमातून अश्व लावून आपल्या अश्वाचे प्रदर्शन करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून माळेगाव यात्रेत आहे. राजकीय नेते आणि अनेक प्रतिष्ठित घराण्यांचे घोडे माळेगाव यात्रेत आणले जातात आणि त्यांचं प्रदर्शन भरवलं जातंय.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या बादल नावाच्या घोड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आमदार हेमंत पाटील यांचे तब्बल सहा घोडे राहुटीत दाखल झालेत. ते पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याची पाहायला मिळतेय. प्रतिष्ठित घराणे डोईफोडे यांचे 12 घोडे माळेगाव यात्रेत दाखल झालेत.

धनंजय मुंडेंचा बादल आकर्षणाचं केंद्र : खरं तर धनंजय मुंडे यांचा बादल हा घोडा सात वर्षांचा असून, काटेवाडी जातीचा हा घोडा आहे. सध्या माळेगाव यात्रेत तो आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अनेक वर्षांपासून मंत्री धनंजय मुंडे हे घोड्याचे शौकीन आहेत. स्वर्गीय पंडितअण्णा मुंडे यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा यापुढे मंत्री धनंजय मुंडेंनीसुद्धा जोपासलीय. ते दरवर्षी आपला घोडा हे माळेगाव यात्रेत आणतात. धनंजय मुंडेंचं घोड्यावर फार प्रेम आहे. घोड्याच्या खाण्या-पिण्याकडे धनंजय मुंडे जातीनं लक्ष देतात. रोज सकाळ-संध्याकाळ चार ते पाच किलो चने आणि दिवसातून दोन वेळा दूध, असा खुराक घोड्यांना दिला जातो. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या राहुटीत घोडा पाहण्यासाठी आलेल्या अश्व प्रेमींना अन्नदानाचेही वाटप केले जाते. तसेच धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील नागरिकांना जेवण आणि झोपण्याची सोयसुद्धा या राहुटीत केली जाते. यापूर्वी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची माधुरी घोडी आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा राजा हा घोडादेखील अश्वप्रेमींनी पाहिलाय. कैलासवासी दगडूजीराव देशमुखांपासून ही परंपरा जोपासली जातेय.

आमदार हेमंत पाटलांचे सहा घोडे माळेगाव यात्रेत : आमदार हेमंत पाटलांच्या रणवीर नावाचा घोडा मारवाड जातीचा आहे. पंजाबमधील लाल रत्न आणि नुकरा जातीचे घोडेसुद्धा त्यांच्याकडे आहेत. हेमंत पाटील यांचा मुलगा राणा पाटील यांचं घोड्यांवर फार प्रेम असल्याची प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी दिलीय. परभणी जिल्ह्यातील इंद्रजित वरपूडकर यांच्या घोड्याने माळेगाव यात्रेत चांगलाच भाव खाल्ला आहे. तब्बल एक कोटी रुपये घोड्याची किंमत असून, परभणी जिल्ह्यातील इंद्रजित वरपूडकर गेल्या 45 वर्षांपासून माळेगाव यात्रेत येतात. त्यांची ही चौथी पिढी आहे, त्यांनी यात्रेत ब्लेज नावाचा खोडा आणला होता. सारंगखेडा, पुणे, अकलूज, बारामती आणि ओतूर येथे त्यांच्या अश्वांनी बाजी मारलीय. आता त्यांनी हा घोडा माळेगाव प्रदर्शनासाठी आणला होता. त्यांनी या अश्वाची किंमत एक कोटी असल्याचे सांगितले.

प्रतिष्ठित घराणे डोईफोडेंचे 12 घोडे माळेगाव यात्रेत दाखल : वडिलोपार्जित परंपरा जोपासण्यासाठी डोईफोडे परिवार मागील अनेक वर्षांपासून माळेगाव यात्रेत दाखल होतात. सध्या डोईफोडे परिवारातील चौथी पिढी ही माळेगाव यात्रेत दाखल झालीय. एकूण 12 घोडे असून, पंजाब, हरियाणा येथून ब्लू लाईनचे नुकरा जातीचे घोडे आहेत. महागडी गाडी मर्सिडीज घेण्याचंसुद्धा माणूस धाडस करू शकते. पण एखादा 50 हजारांचा घोडा घेण्याचं धाडस करू शकत नाही. कारण घोड्यांचं संगोपन करणं खूप अवघड आहे. घोड्यांची स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्यांच्या आजारासह इतर सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष दिले जात असल्याची प्रतिक्रिया शैलेंद्र डोईफोडे यांनी दिलीय. माळेगाव यात्रेत 40 हजारांपासून ते तब्बल एक कोटी रुपयांपर्यंतचे घोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे माळेगाव यात्रेत अश्वप्रेमींनी प्रचंड अशी गर्दी केलीय.

हेही वाचाः

माळेगावच्या यात्रेत फायटर कोंबडा खातोय भाव; एक वर्षाच्या फायटर कोंबड्याची किंमत 20 ते 25 हजार रुपये

माळेगाव यात्रेत लावणी कलावंतांचे दमदार अदाकारीसह ठुमके; रसिकांनीही धरला ठेका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.