VIDEO : पावसाच्या तावडीतून वाचलेलं सोयाबीन पुन्हा पाण्यात - वाशिममध्ये ट्रॅक्टर अडकला नाल्यात, सोयाबीन भिजले
🎬 Watch Now: Feature Video

वाशिम : पावसाच्या थैमानामुळे ग्रामीण भागातील शेतात जाणारे पांदण रस्ते चिखमय झाले असून, नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील शेतकरी प्रकाश गौर आणि गजानन तडस या शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन ट्रॅक्टरमधून घरी आणत असताना ट्रॅक्टर नाल्यात फसल्याने ट्रॉलीतील सोयाबीन पाण्यात भिजले. तर काही पोते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.