नरनाळा किल्ल्यावर जाताना वाघाचे दर्शन - tige news
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव भारसाकडे हे आपल्या कुटुंबासोबत नरनाळा किल्ला पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा किल्ला चढताना पाणवठयाशेजारी झोपलेल्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. पर्यटनासाठी गेले असता अचानक वाघाचे दर्शन झाल्याने त्यांचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे मत संजीव पाटील भारसाकडे यांनी व्यक्त केले. त्यांच्यासमवेत संजय भारसाकळे, नेहा भारसाकळे, चिरंजीव कृष्णाल भारसाकळे, कुमारी रिद्धी भूषण भारसाकळे, शाष्वत भारसाकळे श्याम देशमुख हे उपस्थित होते.