Mumbai Rape Case : महिला अत्याचाराच्या घटनांना मुख्यमंत्रीच जबाबदार - नवनीत राणांचा गंभीर आरोप - नवनीत राणांचा गंभीर आरोप
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - मुंबईतील साकीनाका परिसरात,पुण्यात तसेच अमरावतीत झालेल्या महिला अत्याचाऱ्याच्या घटनांवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे झोपून असल्याने व ते मातोश्री बाहेर निघत नसल्याने अशा घटना वाढल्या आहे. राज्यात एकही महिला सुरक्षित नसल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.मुंबईच्या साकीनाका परिसरात दोन दिवसांपूर्वी एका महिलेवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. त्यात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर आरोपींना तात्काळ शिक्षा मिळण्यासाठी राज्य सरकारने शक्ति कायदा आणला होता. तो मात्र अजूनही मंजूर केला नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान मागील दीड वर्षांपासून राज्यांतील महिला आयोगाला अद्यापही एका अध्यक्षची निवड या सरकारने केली नाही. त्यामुळे हे सरकार महिला विषयी किती गंभीर आहे लक्ष्यात येत असल्याच ही नवनीत राणा म्हणाल्या.