Lata Mangeshkar Nagpur Connection : पाहा लता दीदींचे पैठणीप्रेम..'ईटीव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्टमधून - लता मंगेशकर पैठणी साड्या
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14399927-thumbnail-3x2-sari.jpg)
नागपूर - लता मंगेशकर जशा उत्तम खवय्या होत्या तसे त्यांचे साड्यांवरही विशेष प्रेम होते. खास करून पैठणी साडीवर नागपूरला कार्यक्रमाच्या निमित्ताने दीदी आल्या असताना त्यांना साडीचा पदर आवडला. आणि त्या बहिणीसह महिंद्रकर आणि सन्स यांच्या दुकानातून साड्या खरेदी करण्यास आल्या. ही आठवण या दुकानाचे मालक असलेले आशुतोष महिंद्रकर यांनी सांगितली. त्यांच्या दुकानातून 20 नोव्हेंबर 1996 रोजी लता दीदी आणि बहिणींनी पैठणी खरेदी केली होती. यामुळे त्यांचे मंगेशकर कुटुंबाशी कौंटुबिक नाते निर्माण झाले होते. त्यांच्यासाठी दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर येवल्याच्या कारागिरांनी ती पैठणी तयार करून नागपुरात पाठवली. लता मंगेशकरांना ती आवडली होती.