उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मधले मुख्यमंत्री, भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचे नाव नाही - संजय राऊत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांचा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र यात एकाही भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश नसल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. टॉप फाईव्ह मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आले आहे, ही मोठी बाब आहे. महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केले, यावर विरोधकांनी यापूर्वी अनेकदा गाजावाजा केला, ढोल बडवले मात्र कामाची दखल घेतली गेली नाही. मुख्यमंत्री काम करत नाही घरी बसतात अशी टीका केली, पण कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद संपूर्ण जगाने, देशानं घेतली असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, जो पोल आहे तो एका प्रतिष्ठित संस्थेचा पोल आहे आणि त्यांनी दिलेल्या या पोलमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा नाव नाहीये. स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं टाॅ पाच मध्ये नावे आली आहेत. कोव्हिड काळात वर्क फ्राॅम होम काळाची गरज आहे. मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरलात, असा टोला त्यांना भाजपाला नाव न घेता लगावला आहे. जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट वाढणार असल्याेचही म्हणत राऊत यांनी यावेळी नाव न घेता नारायण राणे आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना टोला लगवला आहे
Last Updated : Aug 18, 2021, 12:40 PM IST