VIDEO : 'केंद्र सरकारने पुन्हा शेतकरी कायदे लागू केल्यास आंदोलन' - राजेंद्र कोरडे - शेतकरी कामगार पक्षाची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्र सरकारने देशात नवे कृषी कायदा (Farm Laws) लागू केल्यावर देशातील शेतकरी याच्या विरोधात रस्त्यावर उतरला होता एक वर्षाच्या जवळपास दिल्लीतील सीमेवर आंदोलन करत होता अखेर या हुकूमशाही सरकारला जाग आणण्यात शेतकऱ्यांना यश आलं आहे. त्यामुळे या जुलमी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेतले (Farm Laws Repulsion) आहे. जर केंद्र सरकारने पुन्हा हे कायदे लागू करण्याचा विचार केल्यास शेतकरी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी दिला आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकर्यांचा विजय आहे. ज्या प्रमाणात सरकारच्या विरोधात शेतकरी एकजुटीने उभा राहिला त्याचा हा विजय आहे. त्यामुळे आज शेतकरी कामगार पक्षाकडून ढोल-ताशे वाजवत, फटाके फोडत शेतकऱ्यांचा विजय साजरा झाल्याचे राजेंद्र कोरडे यांनी म्हटले आहे.