शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका; संजय राऊतांचा भाजपाला इशारा - संजय राऊत यांच्या बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा युवा मोर्चाने बुधवारी शिवसेना भवन वर फटकार मोर्चा काढला. शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान झालेल्या हाणामारीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना 'शिव प्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, असा सज्जड इशारा भाजपाला दिला. शिवसेना आणि भाजपामध्ये यामुळे चांगलेच शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे.