प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी कॅप्टन दिपक साठे योद्ध्याप्रमाणे लढले: सेवानिवृत्त विंग कमांडर संजीव पै
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - काल केरळच्या कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या विमानाचे वैमानिक असलेल्या दिपक साठे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. एअर इंडियात रुजू होण्या अगोदर साठे हवाई दलात लढाऊ वैमानिक(विंग कमांडर) म्हणून कार्यरत होते. साठे हे निपुण वैमानिक होते. कठीण प्रसंगात प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी जे केले ते एखादा योद्धाच करू शकतो. त्यांच्या संपूर्ण कुटूंबाचे देशकार्यासाठी योगदान आहे, अशा भावना त्यांचे मित्र आणि सेवानिवृत्त विंग कमांडर संजीव पै यांनी व्यक्त केल्या.