तमाशास परवानगी न दिल्यास अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन - रघुवीर खेडकर - Warning of self-immolation of Raghuveer Khedkar
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - लोककला असलेला तमाशा हा लोक पावत चालला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आम्हाला आर्थिक मदत देत तमाशा सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या दोन फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर सामूहिक आत्मदहन केल्या शिवाय पर्याय नाही, असा इशारा अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिलाय. ते पुण्याच्या नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना काळ सुरू झाल्य़ामुळे गेली दोन वर्षे गावागावात भरल्या जाणाऱ्या जत्रा बंद आहेत. त्यामुळे तमाशा बंद झाला आहे. यावर ज्यांची उपजिवीका आहे असे हजारो कलावंत देशोधडीला लागले आहेत. त्यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका गेली काही महिने रघुवीर खेडकरसह अनेक तमाशा कलावंत आणि निर्माते करीत आहे. त्यामुळे तमाशा परिषदेने हा अखेरचा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला आहे. यावर शासन कोणता निर्णय घेणार याकडे लोककलाकार आणि महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.