वासुदेवाच्या पात्रात लसीकरणाबाबत जनजागृती - नंदुरबार लेटेस्ट
🎬 Watch Now: Feature Video
नंदुरबार - हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे, कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता जिल्ह्यात विविध प्रयोग राबवले जात आहेत. यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी खान्देशी भाषेत व आदिवासी भाषेत नागरिकांमध्ये जनजागृती केली. शहादा तालुक्यातील बिलाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करत आहेत. ते वेगवेगळे रूप धारण करून नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांमध्ये असलेल्या लसीकरणाचे गैरसमज दुर करुन, त्यांच्यातील लसीकरणाचे भय काढून टाकण्यासाठी हे शिक्षक चक्क बहुरुपी बनले आहे. कधी वासुदेव, तर कधी शंकर भगवान तर कधी पोलीस कर्मचारी बनुन ते गावातल्या लोकांचे लसीकरण प्रबोधन करत आहेत. सचिन पत्की हे नुसतेच लसीकरणाचे प्रबोधन न करता त्यांच्याकडे असलेल्या वासुदेवाच्या गाठोडीतुन लोकांना स्वखर्चाने मास्क, सॅनिटायझर आणि हात धुण्याचे साबण वाटप करत आहेत. पत्की यांचा हा प्रयोग पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिक्षण विभागासह मुख्याध्यापकांचे कौतुक केले व अशा प्रकारचे इतर प्रयोग राबवण्याचेही सांगितले.
Last Updated : May 4, 2021, 1:06 PM IST