पवना धरण ओव्हरफ्लो; सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू - pune rain
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - मावळ तालुक्यात मागील काही दिवसांपासून धरण परिसरात पावसाने जोरदार बाटिंग केल्याने धरण ८६ टक्के भरले असून धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाली असून पवना धरणातून ४६५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणामध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सहा दरवाजे अर्धा फूट उघडून सांडव्यावरुन विद्युत जनित्राद्वारे १४०० क्युसेक व सांडव्याद्वारे ३२५० क्युसेक असा एकुण ४६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.