अर्थसंकल्पात दीड लाख कोटीची तुट, हातात फारसे काही येणार नाही - दरेकर - अर्थसंकल्प आज सादर झाला
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोना संकटकाळात अनेकांना संकटाला सामोरे जावे लागले. जनतेच्या हातात काय लागेल हे पहावे लागेल. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्र्यांनी एक दीड लाख कोटीची महसुली तूट निर्माण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पहिल्यांदाचा नाउमेद असेल तर अर्थसंकल्पात फारसे हाताला काय लागणार नाही असे दिसत आहे. तसेच विकास दरात उणे ८ ही घसरण अर्थसंकल्पासाठी योग्य चिन्ह नसल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
देशभरात कोरोना संपुष्टात आला, मात्र आपल्या राज्य सरकार अजून चाचपड आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
Last Updated : Mar 8, 2021, 1:59 PM IST