वर्धा बेकायदेशीर गर्भपात प्रकरण: सर्व आरोग्य व्यवस्थेवर एक काळीमा असलेली घटना - डॉ. नीलम गोऱ्हे - अवैध गर्भपात प्रकरण आर्वी
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - वर्धा जिल्ह्यातील आर्वी ( Arvi illegal abortion case ) येथे घडलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील महिला डॉक्टर रेखा नीरज कदम यांच्या कदम हॉस्पिटलच्या आवारात भ्रुणांच्या ११ कवट्या आणि ५५ हाडांचे अवशेष मिळाले आहेत. हाडांचे अवशेष हे एका जुन्या गोबर गॅसच्या खड्ड्यात मिळाल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली. या प्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, यापूर्वीही बीड आणि सांगली जिल्ह्यात यासारखे प्रकरण झाले आहे. हे प्रकरणाने आरोग्य व्यवस्थेला काळीमा आलेला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. दोषारोपपत्र दाखल होऊन या प्रकरणाचा निकाल लवकर आणि योग्य दृष्टीने लागावा यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे विधान परिषदेच्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या.