Navratri special - सर्व विश्वाची शक्ती असणारी `कुष्माण्डा' देवी - Navratri special
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - अशी ही विश्वशक्ती `कुष्माण्डा' हीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तुंची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्यांच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे. ही देवी अष्टभूजा आहे. तिच्या हातात कमंडलू, धनुष्य बाण, कमळ, अमृतकलश, चंद्र, गदा आणि कमंडलू, माला आहे. अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मिनाक्षीदेवी असेही म्हणतात. हिच्या हातातील जपमाला साधकाला सर्व सिद्धी व निधी देतात. हिचे वाहन सिंह आहे. ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी आहे, त्यांनी या शक्तीची उपासना करावी. आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे. जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्विकृती, किर्ती, सामर्थ्य , आरोग्य प्राप्त होते. हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दु:खं दूर होऊन संसाररूपी भवसागर तरुन जाण्याची शक्ती देते. तसेच आध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो. या श्लोकाद्वारे देवीची आराधना करतात.
सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।दधाना हस्तेपद्माभ्यो कुष्माण्डा शुभदास्तुमे।दुर्गविनाशिनी त्वंहि दारिद्र्यादि विनाशिनीजगन्माता जगत् कर्ती जगदाधार रुपिणीम।चराचरेश्वरी कुष्माण्डे प्रणमाम्यहमत्रैलोक्यसुंदरी त्वं हि दु:ख, शोक, निवारिणीम,परम आनंदमयी कुष्माण्ड प्रणमाम्यहम।