Mumbai Rains मान्सून मुंबईत दाखल, सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात - मुंबई पाऊस लेटेस्ट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12068243-599-12068243-1623216706887.jpg)
मुंबई - अखेर मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा वेगाने प्रवास सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. या सगळ्याचा परिणाम आजपासूनच मुंबईतील अनेक भागात जाणवू लागला आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसत आहे. दक्षिण मुंबई, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील जाणवू लागला आहे. तसेच मध्य रेल्वेची वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.
Last Updated : Jun 9, 2021, 4:56 PM IST