CCTV : मारहाणीत शाहरुख शेखचा मृत्यू; मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By

Published : Jan 24, 2022, 8:49 PM IST

thumbnail
मुंबई - समतानगर पोलीस स्टेशनजवळ चोरी करत असल्याचा संशय घेत शाहरुख शेख याला येथील नागरिकांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला होता. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक केले. न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर दोन दिवसांनी आरोपी शाहरुख शेख याचा मृत्यू झाला. या मृत्युनंतर शाहरुखच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाला पाहिजे असे सांगितले. यावर पोलिसांनी पब्लिकने मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पीएम रिपोर्टच्या अधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.