महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुरुवात; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
जालना- जिल्ह्यातील आठ केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुरुवात झाली आहे. सुमारे दोन हजार विद्यार्थी आज दोन सत्रात परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठीही आयोगाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमावलीनुसार उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना किमान तीन पदरी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. आयोगाडकून परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच परीक्षेसाठी येणा-या प्रत्येक उमेदवाराचे तापमान तपासणी केली जाणार आहे.