आरे कॉलनीत बिबट्याची दहशत; मांजराचा पाठलाग करत असलेला व्हिडिओ व्हायरल - गोरेगाव पूर्व आरे कॉलनी बिबट्या वावर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गोरेगाव पूर्व आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत वाढत आहे. दिवस असो की रात्र या भागात बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी बिबट्याने मांजराचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ आरे येथील एका मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आहे. व्हिडिओमध्ये पांढरी मांजर मंदिराच्या आवारात हिंडताना दिसत आहे. बिबट्या भिंतीवर चढून मांजरीच्या दिशेने चालतो. एका सेकंदासाठी ते एकमेकांकडे पाहतात. पुढे पाहा हा व्हिडिओ.