शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी इन्शुरन्स कंपनी मागते 500 रुपये - देवेंद्र फडणवीस - maharshtra rain
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13238808-603-13238808-1633165784934.jpg)
वाशिम - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी शनिवारी वाशिम जिल्ह्यातील शिवणी येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अजून पंचनामे झाले नाहीत. आणि शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळाली पाहिजे, यासाठी सरकारला कळवणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.