वादळी पावसाने पाच औद्योगिक कंपन्यांचे छत उडून लाखोंचे नुकसान - सांगली लेटेस्ट
🎬 Watch Now: Feature Video
सांगली (शिराळा) - शनिवारी चार वाजण्याच्या दरम्यान सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊसामुळे एज कंपनी व औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे पत्रे अगदी पात्याच्या पानाप्रमाणे हवेत उडताना पाहून, कामगार व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तर झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. या वादळाच्या तडाख्यात औद्योगिक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी (MIDC) मधील इकोराईज बायोफर्टीलायझर कंपनीची भिंत पडून छत उडाल्याने काम करणाऱ्या तीन मुली व एक महिला जखमी झाल्या आहेत. यामध्ये मेघा लक्ष्मण पाटील (वय 23,रा. चावडे शाहूवाडी) नुतन महादेव डांगे (वय 24, रा. शिराळा) सविता बाजीराव निकम, स्नेहल आनंदराव मस्के (वय 23) यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शिराळा येथील यादव आर्थोपेडीक मध्ये उपचार करण्यात आले आहे.