VIDEO : गोव्यात महिलांच्या सुरक्षेसाठी आता पिंक फोर्स - Banavali Rape Case
🎬 Watch Now: Feature Video
पणजी - मागच्या काही दिवसांपासून ऐरणीवर असणाऱ्या महिला सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोवा सरकारने महिला पोलिसांच्या पिंक फोर्स ची (Pink Force) स्थापना केली आहे. या पिंक फोर्स मध्ये खास प्रशिक्षित केलेल्या महिला राज्याच्या सागरी किनारी भागात 24 तास गस्त घालणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्याला आळा घालण्यासाठी सरकारने या फोर्स ची स्थापना केली आहे. राज्यात मागच्या काही वर्षात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, प्रामुख्याने सागरी किनारी भागात याचा सर्वाधिक समावेश आहे. बाणवली बलात्कार प्रकरण (Banavali Rape Case), सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण (Siddhi Naik’s mysterious death) या घटनांमुळे राज्य सरकारचे पुरते वाभाडे निघाले होते. विधानसभा अधिवेशनात यावर विरोधकांनी आवाज उठविल्यामुळे ही प्रकरणे चांगलीच गाजली होती. यातूनच धडा घेऊन मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री डॉ प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी फोर्सची स्थापना केली आहे. राज्यात येणारे पर्यटक, महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी हे पिंक फोर्स 24 तास तैनात राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.