VIDEO : मिरजेत फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा पुतळ्यांचे उद्घाटन
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - जगातल्या परिचारिकांचे दैवत समजल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा देशातला पहिला पुतळा सांगलीच्या मिरजमध्ये उभारण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. कोरोनाच्या संकटानंतर जगभरात आरोग्य सेवेचे आणि आरोग्य कर्मचारी विशेषतः नर्स यांचे महत्त्व अधिक वाढले. जगभरातील नर्सेस या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आपले प्रेरणास्थान मानतात. जगातील पहिल्या परिचारिका म्हणून फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची ओळख आहे. आज देशभरात लाखो परिचारिका काम करतात. मात्र, फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा देशात कुठेही पुतळा नाही. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्यामुळे परिचारिकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या सहकार्याने सांगली महापालिकेच्या मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यात आला आहे. छोटेखानी समारंभामध्ये सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा,सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील परिचारिका उपस्थित होत्या.