वाशिम : शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - जिल्ह्यात मागील 15 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील एकूण खरिपातील 4 लाख 6 हजार हेक्टर पैकी 3 लाख हेक्टरवर सोयाबीन पीक घेतले जात आहे. त्यापैकी जवळपास दीड लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी केली. यासाठी त्यांनी शनिवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदंग आंदोलन केले.