Sangli Floods : 150 घरांना कृष्णेच्या पुराचा विळखा - sangli rain update
🎬 Watch Now: Feature Video
संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे सुमारे दीडशे घरे पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 43 फुटांच्या पुढे गेली आहे. 40 फूट इशारा तर 45 फूटही धोका पातळी आहे. तर कृष्णेने इशारा पातळी ओलांडत धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कृष्णा नदीला आता पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट आणि काका नगर या भागात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. या भागातल्या नागरिकांना गुरुवारी रात्रीपासूनच पालिका प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. जवळपास 200 हून अधिक कुटुंबांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.