आमदार देवेंद्र भुयार साजरा केला बैलपोळा - baipola news
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - वरुड-मोर्शी विधानसभा मतदार संघ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या गावातील गव्हानकुंड गावात जाऊन नदीत उतरत बैलांची रंगरंगोटी व सजावट केली. तसेच त्यांनी पूजन करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार देवेंद्र भुयार हे शेतकरी कुटुंबातले असल्याने दरवर्षी बैलपोळा साजरा करतात. श्रावणाच्या शेवटी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो.यंदाही आमदार देवेंद्र भुयार यांना बैलपोळा साजरा केला.