VIDEO : दीक्षाभूमीचे कार्यक्रम रद्द, स्तुपाचे दर्शन घेता येणार - 65 Dhamma Chakka Pravartan Anniversary Day
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीचे सामूहिक कार्यक्रम रद्द झाले असले तरी यंदा दीक्षाभूमीचे दार हे अनुयायांसाठी खुले झालेले आहेत. 65 वा धम्म चक्क प्रवर्तन वर्धापन दिन साजरा होत आहे. मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अनुयायांना यावेळी स्तुपाच्या आत जाऊन बुद्ध मूर्ती, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेता येणार आहे. 65 व्या धम्मचक्र परवर्तन दिनानिमित्त आजपासून जय भीमचा नारा देत अनुयायी हे दर्शनासाठी दीक्षाभूमीकडे येऊ लागले आहेत.