मुंबईत रस्त्यांची दुरवस्था, बदल घडवण्यासाठी सत्तांतराची गरज- महेश कोठारे - nutrition kits
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रामध्ये कुपोषित मुलांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मुंबई सारख्या प्रगत शहरात देखील कुपोषितांमध्ये वाढ होत आहे. मुंबईच्या दहिसर या विभागात 1000 पेक्षा जास्त कुपोषित मुलांचे प्रमाण दिसून आले. यासाठी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी कुपोषित मुलांना तसेच गरोदर महिलांना न्यूट्रिशियन किटच्या वाटपाचे आयोजन केले होते. या किटचे वाटप सिने अभिनेते निर्माता महेश कोठारे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुंबईमध्ये कुपोषित मुलांच्या प्रमाणात वाढ होत आहे, हे दुर्देव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असणाऱ्या महानगरपालिकामध्ये आता बदल होण्याची गरज आहे. रस्त्यांची देखील दुरवस्था दिसून येत आहे यासाठी सत्तांतर बदल होण्याची गरज आहे, असे महेश कोठारे यांनी सांगितले.