आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावर बच्चू कडूंची नाराजी - आरोग्य विभागाची परीक्षा
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : राज्यात आरोग्य विभागाच्या नुकत्याच पार पडल्या. मात्र काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पेपर फुटल्याने मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होताना दिसतो आहे. त्यामुळे आता लोकशाहीत पैसा महत्वाचा ठरताना दिसत आहे असे कडू म्हणाले. गोरगरीब विध्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात. त्यामुळे परीक्षा आणि भरतीमध्ये पैसा महत्वाचा ठरू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याचे कडू यांनी सांगितले. राज्यातील परीक्षा या पारदर्शकतेने घेतल्या जाव्या. गरीब विध्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यातील पेपर फुटीच्या घटना या गंभीर आहेत. याची तात्काळ चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.